तुझ्या खुल्या बटांची..

तुझ्या खुल्या बटांची..
रेंगाळणारी काळी..
गालांवरील लाली..
जिव माझा जाळी..

ओठांची गुलाबी..
पाकळी कोवळी..
रस भरल्या जिभेची..
गोडी जणू सोवळी..

डोळे तुझे नशिले..
मदभरे करून गेली..
कवेत हवा विसावा..
ही आस मनी आली...

पापण्यांचे हळूच झुकणे..
अन् प्रश्न तुझ्या भाळी..
प्रेमाच्या या मळ्याचा..
बनशील का रे माळी.??
---विक्रम वाडकर.22/04/2015 12:01 am

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १