जेव्हा सुरुवात होते प्रेमाला...

एक झाडाच्या फांदीवर कळी आली जन्माला,
ओल्या दवात न्हाऊनी धुंद केली मधुशाला,
स्तब्ध होते नभ सारे, मुग्ध होती वसुंधरा,
सुगंधाच्या घेउन लाटा उधाण आले सागराला,
का घडले नकळत सगळे काहीच न्हवते कळले मला,
कदाचित असेच होत असेल जेव्हा सुरुवात होते प्रेमाला||धृ||

रात्रीच्या अंधारात झोपेला निवारा मिळत नाही,
जरी आली डुलकी तरी तिच्याशिवाय कोणी दिसत नाही,
पहिला किरण सुर्याचा वाटतो एक दिवस पूर्ण,
वर्ष सरावे एक जसे तसाच क्षणही वाटतो जीर्ण,
डोक्यात असतो विचार एकच, पंख फूटतात मनाला ||१||

विचारांच्या वादलात एकच विषय असतो,
सगळे चेहरे विरघलातात एकच चेहरा दिसतो,
आनंदाचा पुर येतो जिथे दुःख हा शब्द नसतो,
हे सगळे पाहून वाटते का माणुस प्रेमात पडतो?
एखादा फसला जरी त्यामधे मदत करावी लागते जगाला||२||

हाक देते जेव्हा मन तुला,
एकच साद ऐकू येते मला,
"प्रेमात पडला आहेस तू",
याच स्वप्नाचा झुलतो झुला,
तुला तेच झाले आहे लोक म्हणतात 'प्रेम' ज्याला ||३||

--------------विक्रम वाडकर----------------

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १