दोन प्रेतं

एकदा दोन प्रेतं जळत होती सरनात,
एक होत सागावर , एक होत चंदनात...||धृ||

सागावरल बोलल मी होतो शेतकरी,
रक्ताच पानी करून रोज कष्ट करी,
लाख संकट आली माझ्या आयुष्यवरी,
नाही भ्यायालो त्यांना नाही बसलो घरी,
चार दिवस सुखाचे मीही ग्रहण केले,
पण ते अत्तराचे क्षण हातातून गेले,
माझ्याच स्वप्नांना मी पिंजर्यात पाहिले,
कष्ट करता करता मला जगयाचेच राहिले,
आली नाही मजा या , जीवनरूपी मरनात......||१||

चंदनावरील प्रेत मात्र गप्प गप्प राहिल,
सरनालाही त्याने अश्रुंच फूल वाहिल,
मग हळूच काही शब्दात तेहि चोरून बोलल,
श्रीमंतीच्या पड़द्यामगील पुस्तक त्याने खोलल,
आयुष्यात त्याने खुप पैसा कमाविला,
घर सोडून त्याने बाहेरच जीव रमविला,
पण एकच दुःख त्याच्या अंत:मनात होतं,
पैशाशिवाय आयुष्यात काहीच जास्त न्हवत,
म्हणुन जीवन सोडून आलो मृत्युच्या शरनात........||२||

मग राख राख होउन दोघेही पाण्यात गेले,
काय दूर गेलं आणि काय हाती उरले?,
सागाने केले काय अन काय चंदनाने केले?,
सरनाची राख करून त्यांना पानयाताच नेले,
म्हणुन सांगतो तुम्हाला गरीब वा श्रीमंत,
मृत्युनंतर असते सर्वांना एकच खंत,
तत्पूर्वी करू स्वताचा दृष्टांत,
संकट आली कितीही तरी हसतच होईल अंत.
नका करू फरक आता अभिमन्यु आणि कर्णात........||३||
===================================विक्रम वाडकर

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १