===आयुष्य म्हणजे===

आयुष्य म्हणजे केळीचे पान ;
आयुष्य म्हणजे हिरवे रान ;

आयुष्य म्हणजे गार वारा ;
आयुष्य म्हणजे पावसाच्या धारा ;

आयुष्य म्हणजे जाळीदार खिड़की ;
आयुष्य म्हणजे पाण्यातली बेडकी ;

आयुष्य म्हणजे फुटलेली काच ;
आयुष्य म्हणजे जगणे उगाच ;

आयुष्य म्हणजे हसरी परी ;
आयुष्य म्हणजे मोठी दरी ;

आयुष्य म्हणजे समुद्राची लाट ;
आयुष्य म्हणजे भिजरी पायवाट ;

आयुष्य म्हणजे लताची गाणी ;
आयुष्य म्हणजे देवाची वाणी ;

आयुष्य म्हणजे भगवदगीता ;
आयुष्य म्हणजे ही कविता ............

====विक्रम वाडकर====

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १