===आता तरी परत ये===

माझ्या मनाच्या जवळची ही एक कविता......

खुप दूर गेलीस तू , आता तरी परत ये,
आणि मला कवेत घे .....

आपला पहिला दिवस भेटीचा मला नेहमीच आठवतो,
तुझा मोहक चेहरा मला पुन्हा तिथे पाठवतो,
डोळ्यात काजळ घालून नजरेने जख्मी केले होतेस,
केसांवर गजरा मालून सुगंधाचे मारे केले होतेस,
पुन्हा एकदा येउन अशीच मला त्या युगात ने.........||

मैत्री पक्की होण्याआधी तू मला भाषेच पुस्तक दिले होते,
मनावर ताबा न ठेवता मीही 'I LOVE YOU' लिहिले होते,
नवविची पहिली कविता म्हणुन वाचायची राहिली होती,
कविता तर नाहीच वाचली ,पण मीच कोरले त्यावर ३ मोती,
त्यावेळी आलेला राग पुन्हा तरी येऊ दे...........||

काही महिन्यानंतर मी विचार तुझा सोडून दिला,
तेव्हा तूच तर येउन स्वतः मला propose केला,
आनंदच आनंद देऊन दिलास आश्चर्याचा धक्का,
शेवटपर्यंत निभावन्याचा विचार केलास पक्का,
वाट पाहतोय त्याची अस माझ प्रेम हे.........||

काही दिवसांनी हे प्रकरण पालकांच्या ध्यानात आले,
तू तर प्रेमावर ठाम होतीस मलाच पावुल मागे घ्यावे लागले,
तुला नाही झाले सहन म्हणुन भलते-सलते केले होतेस,
माझाच निर्णय चुकला वाटत? असे मला उमगले होते,
माझी वेळ झाली ती आता तुही जाणून घे..........||

तू विचार बदलला तेव्हा महिना होता बोर्डाला,
नाही म्हणुन तू मात्र फार बैचैन केलेस मला,
मला वाटल तेव्हा तू खुपच बदलून गेली होतीस,
आधीची हळवी तू आता स्वार्थी झाली होतीस,
आता तरी जाणवेल तुला, आधी नाही जनावाले जे.......||

===विक्रम वाडकर===

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १