देणारा देऊन गेला, घेणारा घेउन गेला....

'विंदा'च्या आठवणी ताज्या राहतील यात काही शंका नाही, अशा महान कवी साठी लिहिलेली ही माझी आदरांजली.....


देणारा देऊन गेला, घेणारा घेउन गेला...||

महाराष्ट्राच्या मायभूमीला काव्य रुपाची गंगा दिली..
तुकोबांच्या कवितेसम कला अशी अभंगा दिली..;

साहित्याच्या भांडारात सुर दिले अन शब्द दिले...
विचारांच्या सागराला नविन असे प्रारब्ध दिले...;

भारताच्या इतिहासात एक कवी येउन गेला..
नक्षत्रांचे देणे मात्र न विसरता देऊन गेला..;

देणारा देऊन गेला, घेणारा घेउन गेला...
देता देता आज अचानक, आठवणी ठेवून गेला....||

===विक्रम वाडकर===(२१.०३.१०)


'विंदा'ना आणि त्यांच्या कवितांना प्रणाम....

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १