स्वातंत्र दिना निमित्त पोवाडा

हे राष्ट्र खरया मर्दाचे ......हे हे हे हे हे SSS,
हे राष्ट्र खरया मर्दाचे , नाही परक्याचे ;
नसे इथे कधी गुलामी बाज़ , (२)
ना चले कोणाचाही माज , (२)
जनतेचा असे हिंदवी राज ,(२)
इथे आहे शुरांचा सहवास....... जी जी जी जी जी ||

सुरुवात केली 'बाबु' नी ,(२)
आम्ही आहोत खुप अभिमानी ,(२)
हे सांगितले ठाम मनानी ,(२)
निषेध केला जीव त्यागुनी.......जी जी जी जी जी ||

आता टीलक म्हणाले हरी ,(२)
स्वराज्याची वाजवली बासरी ,(२)
मग काढला हिंद-केसरी ,(२)
पावुल ना पड़े माघारी ........जी जी जी जी जी ||

भगतने मांडला घाट ,(२)
लावू इग्रजांची आम्ही वाट ,(२)
खजान्याची लावू विल्हेवाट ,(२)
म्हणुन केला काकोरी कट ..........जी जी जी जी जी ||

हाक आली मर्द सुभाषी ,(२)
'खून दो फिर मिलेगी आझादी' ,(२)
ही गोष्ट नाही आहे साधी ,(२)
हे राष्ट्र आमचे आदी-अनादी ...........जी जी जी जी जी ||

बापूंनी केला इथे संग्राम ,(२)
दिला सत्याग्रहाचा पैगाम ,(२)
इंग्रजांना केला राम-राम ,(२)
म्हणुन पूजला साबरमती धाम......जी जी जी जी जी ||
जी जी जी जी जी sssssssssssssssssss .....
-- विक्रम वाडकर --

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १