===अजुन एक उनाड दिवस===

अजुन एक उनाड दिवस तुझ्याविना जगते आहे,
तुझीच वाट बघते आहे... तुझीच वाट बघते आहे...!!

रोज सकाळी तुला फ़ोन मी करायची,
तुझा आवाजासाठी मी क्षण क्षण झुरायाची,
देवाजवळ रोज मी तुझा नंबर मागते आहे......तुझीच वाट बघते आहे....||

आपण जिथे भेटायचो तिथे रोजच आता जाते,
तुला आवडणारी गाणी मोठ्या-मोठ्याने गाते,
माहीत नाही का पण अशीच आता वागते आहे.....तुझीच वाट बघते आहे....||

सोडून गेलास मला अर्ध्या वाटेवर सोडून,
जगते आता आयुष्य कस-बस ओढून,
आठवणीची कळ या मनात सारखी निघते आहे......तुझीच वाट बघते आहे....||

===नामहीन===

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १