===तुकाराम ओंबले ===

रोजचीच ड्यूटी होती,
साहेब पण आले होते...
चेहरे सारे तेच होते पण आज मात्र घामानी ओले झाले होते....

तसे पोलिस म्हणून भरती झालो तेव्हा पासून...सवय होती...
सवय...
हे असे चेहरे बघायची...
अन मग अनोलखी वागायाची...
सवय...

माहित नाही का, पण आज साहेब ज़रा जास्त चिंतेत दिसले...
विचारल मी त्याना 'WHAT HAPPENED SIR?, काही चुकीचे झाले?'
ते मला बोलले
'आज या मुंबई पोलिसांवर एक मोठी जबाबदारी आली आहे,
ताज मधे आतंकाची रंगीत तालीम झाली आहे'

ते उठले , माझ्याकडे वळले...
बोलले 'आज कोणी दिड-दमड़ीचे शत्रु आमच्यावर वार करू पहातात,
चला दाखवुया या महाराष्ट्राच्या...मुंबईच्या पोलिसांचा दनका... गाड़ी काढ़ा'

साहेबांचे ते उदगार कानशील गरम करून गेले....
जणू कोणीतरी उकळत्या शिसाचा रस कानात ओतला आहे....
बस ......
आता आम्ही उठलो...
आणि बसलो गाडीत...

गाडी तड़क ताजच्या बाहेर पोहोचली ....
साहेब उतरले ... अन मला म्हणाले
'तुकाराम, रक्ताचा थेम्ब अंगात जिवंत असेपर्यंत लढेन...पण जर मला काही झाल तर तू छातीचा कोट करून यांना बाहेर काढ...'
मीही साहेबांना शब्द दिला....

लागलीच मला बोलावन आलं, सिनिअर ऑफिसर बोलले मरीन ड्राईव वर जा....
रात्री १२.३० ला मी निघालो
मरीन ड्राईव्ह वर पोहोचलो..

एक स्कोडा गाडी भरधाव आली....
त्यातून गोळ्याची बरसात झाली...

मी त्या गाडीचा पाठलाग केला...
गिरगाव चौपाटीजवळ मग ते अडले...
एकाला समोरुनच यमसदनी धाडले.....
दूसरा जवळ आला , हातात AK-47 होती...
माझे साथीदार येत होते जवळ...
पण तोपर्यंत काय??
कस अडवू या नराधमाला??
साहेबांचे उदगार आठवले...अन गेलो त्याच्या जवळ...
पकडली ती बन्दुक या छातीच्या कोटावर...
अन माझे सोबती येईपर्यंत झेलल्या त्या सर्व गोळ्या.....

अन जेव्हा तो ताब्यात आला ...
तेव्हा...
तेव्हा....फ़क्त इतकेच बोललो.........जय हिंद

===विक्रम वाडकर===(२६.११.०९)

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १