हे प्रेम असं असतं......

सांगतो आज तुम्हाला हे प्रेम कसं असत ,
दिसतं तसं नसतं हे प्रेम असं असत||

वचने देतात यात जी नंतर आठवत नाहीत,
दोन क्षनांच प्रेम होत मग काहीच उरत नाही,
यात शिरलं एकदा ,की नंतर अवघड असतं||

मुली घेतात करून ऐश म्हणे हा माझा बॉयफ्रेंड,
२ दिवसानंतर 'बॉय' उरतो 'फ्रेंड' ला ती करते 'सेंड',
सौंदर्य फ़क्त पाहिल तर नुकसान होत जास्त ||

मुलांचा तर विषयच सोडा मुले पक्की बदमाश,
डोक्यात त्यांच्या शिजत असतो मुली अडकवन्याचा पाश,
मुले ओलखा चांगली जे ओलखन सोप नसतं ||

प्रेमाच्या फंद्यात पडू नका त्याचा त्रास होतो सर्वांना,
आपण सुखी असलो तरी टेंशन येत पालकाना,
कळल नाही खरं प्रेम तर प्रेमातच हे जग फसतं||

प्रेम शरीराने होत नाही त्यात मनांच मिलन असतं,
चाइनीज ची पार्टी दिली ,असं स्वागत त्याच नसतं ,
खरचं हीच किम्मत प्रेमाची ? काय प्रेम इतकं स्वस्त ??????
हे प्रेम असं असतं ...हे प्रेम असं असतं..............

------------विक्रम वाडकर---------------

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १