हे प्रेम कसं करावं?


प्रश्न आला एकदा समोर 'हे प्रेम कसं करावं?' ,
मजनू सारखं मरावं, की रोमियो सारखं झुरावं? ||

प्रेम असावं पान्यासारखं पारदर्शी असणारं ,
नितळ होउन कधी कधी आरशासाराखं दिसणारं ,
कधी वाटतं हेच पाणी मनामधेही मुरावं ||१||

प्रेम असावं रात्रीसारखं कालोखात दडलेल ,
काळ्या रंगाची चादर चांदण्यावर ओढ़लेल ,
अशा या रात्रीमधे चांदण्यातुनच फिरावं ||२||

प्रेमात व्हावं तारा जो रात्री चमकत राहतो ,
दिवस सुरु झाल्यावर मात्र इतरांत मिसलुन जातो ,
पुन्हा रात्र आल्यावर अधिक उजलुन पसरावं ||३||

प्रेमात व्हाव माणुस जे होन अवघड असतं ,
इतरांना समजुन घेउन विश्वासात ते बसतं ,
आनंद वाटुन घ्यावा ,दुःख क्षणात विसरावं ||४||

प्रेमात व्हावं झरा जो नेहमीच खाली पडतो ,
कितीही जोरात पडला तरी पाणी संथच सोडतो ,
त्याच्यासारखं अस्तित्व ठेवून आपणही कायम झरावं ||५||

कळल का तुम्हाला हे प्रेम असं करावं ...........

--------------विक्रम वाडकर--------------

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १