आणखी एक

चांदण्याची रात सरून ,


लख्ख उन्हे दारी आली,

जुन्या अंगणातील तुळस आज,

घरापासून दूर झाली.

आजीच्या त्या गोष्टी आज,

प्रत्येकाला bore झाल्या..

किंचाळलेली गाणी आता,

once वाल्या more झाल्या..

शुभम करोति करण्यासाठी,

वेळ कोणी काढत नाही,

buffet मध्ये जेवणार्यांना,

मायेने कोणी वाढत नाही ...

चांदण्या रात्री झोपायाची,

पद्धत कशी नाहीशी झाली,

गादिवरच्या निजेसाठी,

महागलेली A.C. झाली...

कट्ट्यावरचे मित्र आता,

फेसबुक वरती रमू लागले,

रेशीमगाठी लग्नाच्याही,

नेट वरतीच जमू लागले...

आई आणि वडिलांची,

माया तुम्ही विसरू नका.

एकी तुमची शक्ती आहे,

तीला वाटेत पसरू नका....

--- विक्रम वाडकर.

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १