माणुस आणि इच्छा (लेख)

माणुस आणि इच्छा जोडलेले असतात एका अनामिक धाग्याने ,
एका अवैध मार्गाने.
का ते असतात चुम्बकासारखे, जेव्हा एकमेकांपासून दूर असतात ,तेव्हा खेचले जातात एका मुक्त शक्तिने. आणि जवळ आले की जातात पुन्हा दूर एकमेकांपासून.
याच इच्छा प्रवृत्त करतात माणसाला , त्या पूर्ण करवून घेण्यासाठी , घट्ट धरण्यासाठी.

पण मला हेच कळत नाही की का करतो माणुस इच्छा ?? ज्या पूर्ण होण्याची त्याला स्वथालाच नसते खात्री. आणि स्वतःच फिरवतो स्वतःच्या नशिबावर कात्री.
असते त्याच्यात इतकी शक्ति की नशीबही बदलू शकेल तो, पण नाही करत प्रयत्न त्याचा. नाही करत तो काही त्याग काही कष्ट, आणि म्हनुनच नशीबही होते त्याच्यावर रुष्ट.

पण कधी कधी असे काहीच होत नाही. कष्ट करणारा देखिल राहतो वंचित नशीबापासून. आणि नशीबदेखिल सारख देत राहत हुल्कावन्या.

जीवनाच्या प्रत्येक वाटेवर या इच्छा दगड बनुन असतात. आता त्या दगडाला देव मानून फ़क्त त्याची पूजा करत रहायची की त्याच्यावर मेहनत करून त्याची सुन्दर कलाकृती बनवायची हे सर्वस्वी माणसाच्या हातात आहे.

म्हणुन मला एकच सल्ला द्यावासा वाटतो की,
"करा इच्छा. करा इच्छा, इच्छा वाईट नाहीत ; पण करा प्रयत्न त्या पूर्ण करण्याचा. नका बसु त्यांना उराशी कवटालुन , नाहीतर एका दिवशी या इच्छा गुदमरून गुदमरून तुम्हालाच सोडून देतील."
--------------------------------------------विक्रम वाडकर

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १