कोणीतरी असायला हवं.

खुप वाटतयं आता, की कोणीतरी असायला हवं..
मनापासून माझ्यासोबत, कोणीतरी हसायला हवं..

चिडवण्यासाठी मीही कधी थट्टा तिची करता..
रागावून कोणी रूसायला हवं..
कोणीतरी असायला हवं..
खुप वाटतयं आता, की कोणीतरी असायला हवं..

एकट्याने विचार करताना..शांतपणा सांभाळून..
तिने बाजूला येऊन बसायला हवं..
कोणीतरी असायला हवं..
खुप वाटतयं आता, की कोणीतरी असायला हवं..

दिवसभराच्या कामाने थकून भागून आल्यावर..
काळजीने कोणी पुसायला हवं..
कोणीतरी असायला हवं..
खुप वाटतयं आता, की कोणीतरी असायला हवं..

आईच्या मायेचा वारसा तीने पुढे नेता नेता..
भिंतींसारखं घरामध्ये तीनेही वसायला हवं..
कोणीतरी असायला हवं..
खुप वाटतयं आता, की कोणीतरी असायला हवं..

--विक्रम वाडकर 14/10/2015 12:25 am

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १