--सोहळा--


(विठ्ठल विठ्ठल सार्थ विठ्ठल 
विठ्ठल विठ्ठल आर्त विठ्ठल 
विठ्ठल विठ्ठल सत्य विठ्ठल 
विठ्ठल विठ्ठल अर्थ विठ्ठल )

भेटीलागे मन माझे झालिया व्याकुळा,
पाऊलांना लागलाहे पंढरी डोहाळा..
पांडुरंग ध्यानी-मनी, रुपाने सावळा..
माथी त्याच्या शोभताहे चंदनाचा टिळा..
सोहळा सोहळा विठ्ठलाचा सोहळा..२

तुका आणि नामा आज उतरले खाली,
ठाई-ठाई दिसु लागे पंढरीचा वाली..
कटेवर हात तुझ्या तुळसीहार गळा..
सोहळा सोहळा विठ्ठलाचा सोहळा..

आस वेड्या भक्तीपाई वारीची ही वाट,
डोळीयांना दिसणार कधी, चंद्रभागा काठ..
चोहीकडे भरलाहे संताचा हा मळा..
सोहळा सोहळा विठ्ठलाचा सोहळा..

गुण गातो आवडीने,
मुखी नाम-संकिर्तने..
मांडला गा हा पसारा,
इथे दुःखा नाही थारा..
हाती टाळ-पख््वाज,
भाळी अष्ठगंधी साज..
देही भिनलाहे नाद,
ऐक भक्तांची ही साद..

विठ्ठल विठ्ठल सार्थ विठ्ठल 
विठ्ठल विठ्ठल आर्त विठ्ठल 
विठ्ठल विठ्ठल सत्य विठ्ठल 
विठ्ठल विठ्ठल अर्थ विठ्ठल 
-विक्रम वाडकर (०५-०२-२०१५)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १