उजेडाच्या मागं मी जळतसे आतं..

सांगोनिया गेली समईची वात...
उजेडाच्या मागं मी जळतसे आत..

भले नांगरले काळीज धराचे...
तवा कुठे भरले ग उदर पोराचे..
कष्टावीना गोड घास, कसा संसारात..
उजेडाच्या मागं मी जळतसे आत..

राबराबुनिया पैका जमविला..
पोरा तुझ्या शिक्षणाचा ध्यास मी ठेविला..
तुझ्यापायी केले सारं एक दिन रात...
उजेडाच्या मागं मी जळतसे आत..

खुरपला जीव जवा, झालास साहेब..
सुखापुढं दुखाचे बी मांड तु हिशेबं..
माझ्या हिशेबाचे कागद जपतो उरातं..
उजेडाच्या मागं मी जळतसे आत..

वातं माझी संपताहे वाटुन उजेड..
झाली माझ्या जिवनाची अंतिम रपेडं..
पेटवं आता तुझ्यामधली नवीन ही वातं..
उजेडाच्या मागं तु बी जळशील आत..
उजेडाच्या मागं तु बी जळशील आत..
उजेडाच्या मागं तु बी जळशील आत..

-- विक्रम वाडकर १५-११-१५)

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १