शहारा


कळीतुनी पाकुळले दरवळले आज मी..
दवांमध्ये चिंब भिजू दे मला..
मोरपंखी स्पर्शाने मोहरले आज मी...
प्रेमातच चिंब राहू दे मला..
दे मला तुझा ओला शहारा..
सागराला मिळावा किनारा..
तुझ्या मिठीतला उष्ण निवारा..
सागराला मिळावा किनारा..

कुजबुजल्यासारखे, होतात भास हे..
शांत राहू कसे... सांग रे....
पापण्यांच्या पलीकडे, झोपेस त्रास रे..
पांघरावे कसे... सांग रे..
नजरेतुनी दे मला इशारा..
दे मला तुझा ओला शहारा..

विसरून जाईन मी भान माझे सख्या..
असा प्रेमाने पाहू नको..
तुझ्यामुळे आला अर्थ नवा जगण्याला..
साथ सोडून जाऊ नको..
बरसू दे आज आसमंत सारा..
दे मला तुझा ओला शहारा..
-विक्रम वाडकर 10/07/2015 09:25 pm

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १