तुजवाचुन ना करमते

तुजवाचुन ना करमते.. ना सुचते.. ना कळते...
क्षणात सारे विरघळते...क्षणात काळीज पळते....


भेट होता नजर भिडते... 
नजर भिडता..शब्द मुके...
लाजण्याच्या हरकतीवर... 
अंतरी ठोका चुके...
जीव जे वेडावते.. तुझ्या मुखीचे स्मित ते... 
तुजवाचुन ना करमते.. ना सुचते.. ना कळते...


डोळियांच्या छप्पराला.. 
काजळाचे जे कडे.. 
गाली खुले लाली जणु.. 
अंगंणाशी फुलसडे.. 
मखमलीचा स्पर्श होता.. शिरशिरी ही भरते... 
तुजवाचुन ना करमते.. ना सुचते.. ना कळते...


रुक्ष होता तु कधी... 
भाव वेडा मी झुरे...
पाहवेना ती उदासी... 
जाणवेना मज बरे...
सोसवेना हुंदक्याचे... श्वास.. मनी जे सलते... तुजवाचुन ना करमते.. ना सुचते.. ना कळते...


हातच्या रेषा तुझ्या ज्या... 
जुळुनी आल्या मजवरी...
साथ द्यावी हि मनिषा... 
तुझ्या माझ्या या उरी...
तु नसता सोबती.. तुझीच आठवण छळते... 
तुजवाचुन ना करमते.. ना सुचते.. ना कळते...

===विक्रम वाडकर===(१९-डिसेंबर-२०१३)

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १