बंध तुटले...

बंध तुटले... श्वास सुटले... 
न उरले काही जे हवे ते.
वाढली अंतरे..भेटली उत्तरे..
न उरले काही जे हवे ते.

राहीले किनारे दूर, मज सापडेना सूर;
मोडलेली स्वप्ने उरी, आशेचीही आस धरी;
ना वाटती खरे....
वाढली अंतरे..भेटली उत्तरे..
न उरले काही जे हवे ते....


एकटा मी आज पुन्हा, न राहीलो मी जुना;
होती तुझेच भास, कोंडले मनात श्वास;
बुडाले माझे जग सारे..
वाढली अंतरे..भेटली उत्तरे..
न उरले काही जे हवे ते.


रात्र माझी सोबती, अंधाराशी दोस्ती;
अश्रुंचे साचले तळे, जीव आतूनी का जळे;
जाहली मनाची लख्तरे...
वाढली अंतरे..भेटली उत्तरे..
न उरले काही जे हवे ते.....

बंध तुटले... श्वास सुटले... 
न उरले काही जे हवे ते.
वाढली अंतरे..भेटली उत्तरे..
न उरले काही जे हवे ते.
न उरले काही जे हवे ते.
न उरले काही ....
..
जे हवे ते.


--विक्रम वाडकर (७-२-२०१४)

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १