सजना

वेड्या मना.. तू सांग ना.. ओ सजना..
का चाललासी दूर.. मनी सोसवेना हूरहूर..
ओ सजना.. सजना..ओ सजना..

क्षण काही जुळले तुझे-माझे..
क्षणांचीच अंतरे उरली मागे..
सुख फुलावे हास्य बनुनी..
हास्यामधुनी भावना..
ओ सजना.. सजना..ओ सजना..

आता वाटेमधे डोळ्यांची कवाडे..
तुझ्याविना सुने मनाचे राजवाडे..
परत यावे तू लवकरी..
हि मनाची प्रार्थना..
ओ सजना.. सजना..ओ सजना..

वेड्या मना.. तू सांग ना.. ओ सजना..

-विक्रम वाडकर

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १