क्षणभंगूर


पळतोस माणसा, का दुःखापासून दूर?
आनंदाचे क्षण वेडे, असती क्षणभंगूर..

शिकलास तू हसणं, 
दुस-याच्या दुःखावर,
स्वतःच्या दुःखासाठी, 
का देवापुढे पदर?
हसता हसता रडशील, 
मग वाहेल अश्रूपूर.....

दुस-याच्या डोळ्यांमधल्या,
अश्रुंना पाणी म्हणतो,
स्वतःच्या अपयशावर,
इतका का तू कण्हतो?
गा-हाणे का नभाशी,
तुझाच असे कसूर....

द्यायचे असेल इतरांना तर,
हास्य दे क्षणाचे,
द्वेषाच्या भिंती तोडून,
जोड दुवे मनाचे,
हरवलेल्या स्वरांना,
गवसेल मग सुर....

-विक्रम वाडकर १-१२-१४.

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १