...सावरे...


तुझ्याचसाठी सारे.. तोडून आणिन तारे.. --२
सावर रे.. मला सावरे....

सारे दुवे तुजपाशी..
फुलसडे पायाशी..
सजवले आसमंत..
चांदणे तुजसाठी..
मन का माझे, बावरे..
सावर रे.. मला सावरे....

बांधले सुखाचे धागे..
सोडून दुःखास मागे..
बोल मुके ओठांचे..
मन ओरडून सांगे..
माझिया मनाची हाव रे..
सावर रे.. मला सावरे....

-विक्रम वाडकर (१५-मे -२०१४)

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १