भुल जाऊंगा जहाँन्.. गर तू साथ रहे सदा.


पायी छुम-छुम वाजता, नाचली अंगणे..
पाहुनी तुला सखे, लाजली दर्पणे...
जीव माझा.. वेडापिसा.. करतसे तुझी अदा..
भुल जाऊंगा जहाँन्.. गर तू साथ रहे सदा..

गवाक्षांचे कवडसे, रुळती जे गालांवरी...
सोनेरी केसांची बट जी, भान माझे सावरी...
कटाक्षांच्या जादुगिरीवर.. जाहलो मी फिदा..
भुल जाऊंगा जहाँन्.. गर तू साथ रहे सदा..

मखमली स्पर्श तुझे, उधाण मनी जे आणते...
नजरेचे इशारे तुझ्या मुके भाव ही जाणते..
तुझ्या खळीच्या आत खोल.. हरवलो मी गुमशुदा..
भुल जाऊंगा जहाँन्.. गर तू साथ रहे सदा..

-विक्रम वाडकर २६-१२-१४

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १