मन माझे दिवाने..


हुरहूर लागली ही गोड..सोड..
लाजण्याचे बहाणे..
श्वास स्पंदने मखमली.. मलमली..
स्पर्शाचे तराणे..
गीत माझे तुझ्या ओठी येता, 
कसे जाहले गाणे..
मन माझे दिवाने.. तुझे..
मन माझे दिवाने.. 

रात्र ओल्या जाणिवांची.. वेणीवांची.. 
संचितांची..
बहरलेले मोगरे..अन्..
सड्यांमधले चांदणे..
मन माझे दिवाने.. तुझे..
मन माझे दिवाने.. 

बाहुपाशा गुंतलेले.. गुंफलेले.. 
हरपलेले..
वाटती माझ्या मनाचे..
भानवेडे वागणे..
मन माझे दिवाने.. तुझे..
मन माझे दिवाने.. 

-विक्रम वाडकर ३०-१०-२०१४

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १