नास्तिक-लेख

आस्तिकतेच्या छपराखाली भिरभीरणारं पाखरू होण्यापेक्षा, नास्तिकतेची गरूडभरारी घेणं मला जास्त परवडतं..
कारण त्याला त्याच्या परीस्थितीपेक्षा, स्वतःच्या पंखांवर जास्त विश्वास असतो.
दगडावर कोरलेल्या मनुष्यरूपी देवाची पुजा करण्यापेक्षा, माणसांमध्ये देव शोधण्याचं वेडं बरचं काही शिकवून जातं.
मग श्रदधा आणि अंधश्रदधा यांमधली पुसटशी अंतरेही मोठी वाटू लागतात. 
आणि देवळाबाहेर उभं राहून देवळातल्या देवाला खिजवून त्याच्या हतबलतेवर हसायला मला आवडत..
आस्तिकतेच्या छपराखाली भिरभीरणारं पाखरू होण्यापेक्षा, नास्तिकतेची गरूडभरारी घेणं मला जास्त परवडतं..

तुझ्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांच्या भक्तीचा व्यापार करणारे लोक पाहून स्वत्व हरवलेली माणुसकी हव्यासाने फुगलेला राक्षस बनते. आणि अंधश्रदधेच्या वावटळीत भरकटलेले काही भक्त त्या राक्षसाच्या अधिन होतात.
प्रश्न हा पडतो की, इतके होऊनही स्वतः समजून घेण्यापेक्षा, लोकांच्या अकलेचं घोडं कुठे अडतं..
आस्तिकतेच्या छपराखाली भिरभीरणारं पाखरू होण्यापेक्षा, नास्तिकतेची गरूडभरारी घेणं मला जास्त परवडतं..

समुद्रात झोकून दिलेल्या गलबतासारखं जगणं असावं.. येणा-या हवेच्या प्रवाहाबरोबर वाहतं जाणारं.. पणं त्या प्रवाहात आपला मार्ग काढणारा आणि अडथळयांना सामोरं जाण्याची शक्ती देणारा आत्मविश्वास जवळ बाळगावा..
हे करून यशाला गवसणी घालणारं आयुष्य जेव्हा घडतं, त्यातच मला नास्तिकाच्या स्वतःवरच्या श्रदधेचं गुजं सापडतं.
खरंच......
आस्तिकतेच्या छपराखाली भिरभीरणारं पाखरू होण्यापेक्षा, नास्तिकतेची गरूडभरारी घेणं मला जास्त परवडतं..

--विक्रम वाडकर

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १