ओळखाया लागलो...

ओळखाया लागलो... मी आता माझा मला
भान भुलुनी या जगाचे... सारे असे माझे तुला...

संथ थोडे भाव वेडे... श्वास सांगु लागले...
गंध-धुंदी हे उसासे... खेळ मांडू लागले...
या उराच्या धड-धडीचा... वाढला तो सिलसिला...
भान भुलुनी या जगाचे... सारे असे माझे तुला...

वाट माझी आंधळी पण तुच माझ्या सोबती... 
चुक-सही सांगणारी.. तुच माझी सारथी... 
हात घेऊनी हाती, सांगे.. मी न आता एकला...
भान भुलुनी या जगाचे... सारे असे माझे तुला...

गुंतले धागे मनाचे... तुच माझ्या अंतरी...
सोडणे ना गाठ आता... सात जन्मे जोवरी...
पावलांशी पावलांचा... बंध होऊन राहीला... 
भान भुलुनी या जगाचे... सारे असे माझे तुला...

====विक्रम वाडकर====(१८ डिसेंबर २०१३ ००:४५ )

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १