बैचेन आहे...श्वास माझा....

बैचेन आहे श्वास माझा,
तुझा देखील उष्ण उसासा;
गर्द निळ्या सागरालाा,
जसा पावसाचा दिलासा....

बैचेन आहे...श्वास माझा..श्वास माझा...धुंद सा...

गंध त्या ओल्या बटांचा,
दरवळे वा-यावरी...
बेभान या माझ्या मनाला,
याद तुझी सावरी...
चेहरा उजळून काढे.. पहाटेचा कवडसा....
बैचेन आहे...श्वास माझा..श्वास माझा...धुंद सा...

पैंजनाची छ़नक् छुम-छुम,
नाद कानी गुंजती...
बोल तुझिया जे मनाचे,
स्पर्श मजला सांगती....
गुंफलेला हात तुझा.. देतसे मज भरवसा....
बैचेन आहे...श्वास माझा..श्वास माझा...धुंद सा...

लाजण्याची हरकते,
वेडावती मज रोजची...
रंग जो गाली खुले,
लाली जशी ती सांज ची...
अशीच राहो मजवरी, तुझ्या नयनांची नशा..
बैचेन आहे...श्वास माझा..श्वास माझा...धुंद सा...
बैचेन आहे...श्वास माझा....

-विक्रम वाडकर(१८-०४-२०१४)

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १