हे प्रेम असे का.. वेड लावी जिवा..

मिटता पापण्या.. तू दिसते मला..
हे प्रेम असे का.. वेड लावी जिवा..
बेचैनी मनी दाटते.. तू नसता..
हे प्रेम असे का.. वेड लावी जिवा..

हुरहुर मनाची शब्दांत मांडू कशी?
मृगमना लागे कस्तुरीची ओढ जशी..
ओठांची उमलता पाकळी, सुगंधून जाते हवा..
हे प्रेम असे का.. वेड लावी जिवा..

नक्षत्रांचे सडे सांडती रोज तुझ्या अंगणाशी..
युद्ध रोजचे चंद्र नभीच्या, जमिनीवरल्या चंद्राशी
दे मजला तुझ्या मिठीचा श्रांत विसावा..
हे प्रेम असे का.. वेड लावी जिवा..

हितगुज माझ्या भावनांचे तू समजून घे ना..
प्रेमात बुडालो तुझ्या, मज तारुन ने ना..
तुझ्या एका नजरेने घायाळ मनाचा पारवा..
हे प्रेम असे का.. वेड लावी जिवा..

-विक्रम वाडकर १९-११-२०१४

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १