अश्रूंना आज सापडली वाट..

मोडून सारे डोळीयांचे काठ,
अश्रूंना आज सापडली वाट..अश्रूंना आज सापडली वाट..
मनाच्या खोलवर धुके घनदाट..
अश्रूंना आज सापडली वाट..अश्रूंना आज सापडली वाट..

सलती जीवाला, अशा आठवांना,
अशा भावनांना, शब्द फुटेना...
तुटल्या सुखाच्या, त्या रेशीमगाठी,
दिला हात हाती, सुटता सुटेना...
फिरवली नशीबाने का आज पाठ..
अश्रूंना आज सापडली वाट..

सांगू कुणाला, दुःख उरीचे,
घाव अंतरीचे, कुणा दाखवू..
उणीव तुझी, पावलो पावली,
तुझी सावली, नको भासवू...
किनारा सोडून का विरघळली लाट...
अश्रूंना आज सापडली वाट..

मोडून सारे डोळीयांचे काठ,
अश्रूंना आज सापडली वाट..अश्रूंना आज सापडली वाट..

-विक्रम वाडकर २९-जुलै-२०१४

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १