घना-राधा

------------ भाग १ ------------

केसांवरती कोंबडा त्याच्या... गुबगुबीत होते त्याचे गाल
चेह-यावर फुलणारी तरूणाई.. अन् १६ व त्याच साल...

डोळे तीक्ष्ण.. बुद्धीही तल्लख... वागण्यात ज्याच्या नम्रपणा...
सांगतो आज कहानी त्याची.. ज्याच नाव आहे "घना"...

घना होता हुशार.. प्रत्येक विषयात...
प्रत्येक स्पर्धेत नाव, त्याच पहील्या पाचांत..

आली होती SSC.. पुढील २ वर्षात..
लावू चांगला क्लास... विचार पालकांच्या डोक्यात..

सुरु झाला उन्हाळ्यात.. घनाचा क्लास नवा...
पहील्याच दिवसापासुन त्याची.. क्लासमधेही हवा..

नवीन मित्र बनवण्याची..कला त्याची भारी...
आई-वडीलांच्या शिकवणीची, किमया होती सारी..

२ दिवस सारे... सुरळीत होते चालले...
तिस-या दिवशी काय झाले... त्यालाही नाही कळले..

त्या दिवशी एकीचा, होता पहीला दिवस...
मुलांमधे चर्चा चालली.. बघ तो माल रावस...

घनाने ही मागे वळून.. दाराकडे पाहीले...
सुंदर, सोज्वळ मुलीला.. साहेब बघतच राहीले...

पुर्ण दिवस घना, तिच्याकडे पाहत बसला..
मित्रांनीही ओळखले की... आता हा फसला...

पुढच्या दिवशी तेच सारे.. नकळत होऊन गेले...
या सर्व नादात, तिचे नाव राहून गेले...

जात होती घरी.. तेव्हा आपणहून तिकडे गेला...
काही बोलण्याआधीच... पार गोंधळून गेला....

त्याचे बोलणे ऐकून कळले.. आहे हा खुप साधा...
म्हणून तिने स्वतःच सांगितले... माझे नाव "राधा".......

मैत्री होताच घना खुप खुष झाला..
त्याचा गुलाबी चेहरा.. सगळ्यांच्या डोळ्यात आला...

आता मात्र बोलला.. नको व्हायला उशीर...
म्हणून त्याने जमवला.. थोडासा धीर...

मराठीची कविता पहीली... शिकवत होत्या बाई...
घनाच्या विचारांना मात्र... भलतीच होती घाई.....

न राहवून त्याने घेतले तिचे पुस्तक....
आणि...
प्रेमाच्या ३ शब्दांचे... त्यालाच केले हस्तक......


------------ भाग २ ------------

तिने जेव्हा पाहीले.. पुस्तक पुन्हा खोलून...
डोळ्यांमधला राग तिच्या... दाखवला तिने बोलून...

'मैत्री काय केली... तु भलताच चालू निघालास.. '
शब्द तिचे ऐकून... घना झाला खल्लास...

'पुढच्या वेळी त्रास दिलास तर.. सांगेन मी शिक्षकांना..'
घाबरवण्याचा त्याला तिने.. केला प्रयत्न पुन्हा...

घना देखील काही दिवस.. राहिला थोडा शांत...
वेळ थोडा देऊ तिला.. तिचा नसेल तो प्रांत...

महीन्यानंतर राधाचा वाढदिवस होता आला...
त्या दिवशी तिने पुन्हा.. मैत्रीचा हात दिला...

घना देखील खुशी खुशी मैत्रीत रमू लागला...
तिलादेखील वाटू लागले.. घना आधी का असा वागला..???

घनाच्या मनात पुन्हा.. झाले वादळ सुरू...
छोटे त्याचे डोके लागले... राधाचा विचार करु....

पुन्हा जाऊन त्याने... केला राधाला Propose..
पुन्हा एकदा तिच्या कडून मिळाला त्याला Oppose...

या वेळी घना.. पुर्ण खचून गेला..
आता नाही विचारायचे.. मनात बोलुन गेला..

तेव्हापासुन घना... राहू लागला गप्प..
परीणामी झाला त्याचा.. अभ्यास सारा ठप्प...

नजरेत भरला सगळ्यांच्या.. त्याचा उदास चेहरा..
मित्र देखील त्याच्या वागण्यावर.. ठेऊ लागले पेहरा...

महीना उलटून गेला.. पण घना नाही सावरला...
राधालाही त्याला पाहून मोह नाही आवरला...

उतरलेला त्याचा चेहरा.. त्रास द्यायचा तिला...
काही दिवसांनी मात्र तिने.. अगदी धक्काच दिला...

क्लास नंतर थांबण्यासाठी.. तिने केला इशारा...
घना थोडा गोंधळला.. पाहून खेळ सारा...

सगळे जण गेल्यावर.. तिने दार बंद केले...
घना जवळ जाउन तिने त्याचे डोळे बंद केले...

पुढे जाऊन तिने घेतला.. घनाच्या गालाचा Kiss
'Give me that killing smile...what I really miss'

------------ भाग ३ ------------

रंगू लागली राधा-घनाची नवी प्रेमकहानी...
घना तिचा राजा.. अन् राधाच त्याची राणी..

घना आणि राधा आता रोज लवकर यायचे
क्लासेसच्या नावाखाली बाहेर फिरायला जायचे...

क्लासधे एकेमेकांना.. चोरुन चिठ्ठी लिहायचे..
एकटे असता हातात हात... अन् डोळे मिटून रहायचे..

एकदा मात्र राधाची खुप पंचाईत झाली...
घनाची एक चिठ्ठी.. तिच्या आईच्या हातास आली...

गोंधळलेल्या राधाने मग सांगुन टाकले खरे...
ऐकताक्षणी तिच्या आईला वाटले नाही बरे...

राधाच्या आईने मग गाठले घनाचे घर...
सुदैवाने घना त्यांना.. भेटला दारावर...

राधाच्या आईने त्याला समजावून सांगितले..
'तुच सांग घना.. मी काय वाईट मागितले...???'

'वय तुमचे लहान, थोडा अभ्यासात वेळ घाला,
रहा दोघे एकत्र... पण मैत्रीच्या मर्यादा पाळा....'

घना त्यांच्या होकाराला देत होता होकार...
दुस-या क्षणी त्याला वाटले... देऊया राधाला नकार....

दुस-या दिवशी मात्र ती क्लासला नाही आली...
घनाच्या ही मनाला खुप हुर हुर झाली..

३ दिवसानंतर त्याला राधा दिसली पुन्हा...
भेटीसाठी तो देखील करु लागला खुणा...

क्लासनंतर झाली मग.. घना-राधा भेट...
रडत-रडत गेली ती.. घनाच्या कुशीत थेट.....

बोलू लागली राधा काय झाले आधी..
कशी बेतली जिवावरती, तिची चुक साधी....

'त्या दिवशी आई नी माझ्यामध्ये उडाला थोडा खटका....
त्यानंतर आला आईला हृदयविकाराचा झटका.....'

हे ऐकून घनादेखील ताडकन उडाला...
"काय केलं हे मी??" स्वताःशीच म्हणाला.....

'राधा आपण यापुढे वेगळेच राहुयात...
तुझ्या-माझ्या नात्यामध्ये इथवरचं थांबूयात....'


------------ भाग ४ ------------

राधाच्या डोळ्यांचा बांध तेव्हा फुटला....
घनाच्याही स्वप्नांचा धागा होता सुटला...

आतल्या आत खोलवर रडत होता घना...
दुखाःच्या गर्दीमधे कुढत होता घना...

राधासुद्धा क्लास्मध्ये न्हवती देत लक्ष...
चेहरा तिचा पुर्वीपेक्षा.. झाला फारच रुक्ष...

एक दिवस मित्र माझा पळत-पळत आला...
ऐकून त्याचे बोलणे.. माझा जीवच निघून गेला....

'राधाने पाण्यामधून विष आहे घेतले..'
निरोप त्याचा ऐकून..मी गुडघेच आपले टेकले....

उलटी झाली लगेच म्हणून जीव तिचा वाचला..
घनाच्या पापण्यांवरती.. समुद्र होता साचला.....

स्वतःला दोषी मानून रोज रडत रहायचा...
क्लासमधे तो फक्त तिचीच वाट पहायचा.....

काही दिवसानंतर राधा क्लास मधे आली....
घनाला पाहताच ती पुन्हा सुरू झाली...

अश्रूंची शाळा.. तिच्याही डोळ्यात भरली...
रडता रडता घनाच्या कुशीत जाऊन शिरली...

हुंदक्यांच्या श्वासांनी घना बोलला तिला...
"तुझाच होऊन जगेन" असा शब्द त्याने दिला..

शब्द दिला खरा.. पण पुढे काय करायचे...
क्लास संपल्यावर काय आपण आठवणींतच झुरायचे...

'दोघे आपण आधी थोडे मोठे होऊ...
Settle होऊन मग आपण.. बोहल्यावर जाऊ...'

निर्धार केला दोघांनी आप-आपल्या मनाचा..
अभ्यास देखील चांगला होता राधा आणि घनाचा...

दहावीच्या परिक्षेची झालीच होती तयारी...
अभ्यासात मन त्यांचे विसरून दुनियादारी...

राधा मात्र आता थोडी बदलू लागली होती...
आधीचे मित्र गेले.. नवीन आता सोबती....

इतक्यात एक दिवस राधा घनाजवळ आली...
"आपण वेगळे होऊयात" बोलून मोकळी झाली...


------------ भाग ५ ------------

राधाच्या तोंडाकडे घना पाहत राहीला...
खोटे की खरे म्हणून, चिमटा काढून पाहीला...

राधा अशी अचानक काय बोलून गेली...
घनाच्या प्रेमाला.. शब्दात तोलून गेली...??

पण घना मात्र काही... बोलला नाही तिला...
हातातला हात त्याने.. पटकन सोडून दिला...

ताडकन निघून समुद्राच्या किना-यावर जाऊन पोचला..
समुद्राकडे पाहत.. क्षणभर तोही हसला...

ऊडी मारणार इतक्यात.. एक विचार मनात आला...
एका मुलीपाई त्याने इतका प्रपंच केला???

"परत आली तरच तिचे प्रेम खरे..
नाहीतर दोघे आपापल्या वाटेवरच बरे.."

हा विचार करून तो परत आला घरी..
ती नाही आली तर आपली एकटीच वारी...

नाही आली राधा पुन्हा घनाकडे...
कोणी सोबत नसता, घना तिच्यासाठीच रडे....

आठवणींत तिच्या घना काही शब्द लिहायचा..
कवितांमधुन तो तिला अनुभवत रहायचा...

दिवसामागुन दिवस गेले.. वर्षामागुन वर्ष...
प्रेमाच्या नावालाही त्याने केला नाही स्पर्श...

आता मात्र घना हसायला शिकला
हसु वाटून सगळ्यांना तो जगायलाही शिकला...

मित्रांमधे प्रेम शोधत मिळवला त्याने आनंद..
मैत्रीणींसोबत Flirt करण्याचा बनवला त्याने छंद...

मनात त्याच्या आता कोणी घर करत न्हवते...
क्षणभराचे सोबती.. मनाचे भाडेकरू होते....

भेटल्या खुप मुली.. पण त्यांत भेटली नाही राधा...
म्हणुनच तर घनाचे विचार सोडला ज्यादा....

प्रश्नात एकदा मित्राने साधला त्याचा नेम,
"घना तु केलस का कधी मनापासुन प्रेम????"

"प्रेम प्रेम काही नसत असतो निव्वळ खेळ....
थोडा माझा, थोडा तुझा.. आपण घालवत असतो वेळ....
थोडा माझा, थोडा तुझा.. आपण घालवत असतो वेळ...."

....विक्रम वाडकर....

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १