वेडावला जीव तुजवरी..

ओघळले प्राजक्त, प्रारब्ध स्तब्ध जाहले तुजवरी...
उन्हे कोवळी, सोवळी कळी उमले 
गालावरी...
वेडावला जीव तुजवरी..
वाटे मजला तू परी..
वेडावला जीव तुजवरी..
भास हे कि तू खरी..
वेडावला जीव तुजवरी..

उजळल्या सोनेरी छटा,
तुझ्या केसांच्या बटा..
प्रेम रंगी न्हाऊनी.. जाहले जे सत्वरी..
वेडावला जीव तुजवरी..

मोग-याचे जे सडे,
अंगणाशी सांडले..
ओंजळीने वेचुनी.. उधळले मी अंबरी..
वेडावला जीव तुजवरी..

वाढविसी स्पंदने,
दो दिलांची बंधने..
हास्य तुझे पाहूनी.. जीव हलतो अंतरी..
वेडावला जीव तुजवरी..

-विक्रम वाडकर 

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १