फक्त तुझ्याचसाठी..

जे मुके झाले, तुझ्या ओठांवरले बोल,
समजून गेले सारे, तुझ्या पापण्यांची ओल...

उरले काही नात्यांमधले, विरघळणारे धागे,
तरीही वेडे मन का झुरते, पुन्हा तुझ्याच मागे..

हुरहूर करते क्षणात फिरते, भिरभिरणारी नज़र,
आज-काल का छळतो मजला, आठवणींचा कहर...

गिरधराची राधा तडपे, जशी एका भेटीसाठी,
तसेच तरसे मनमृग माझे, फक्त तुझ्याचसाठी..
तसेच तरसे मनमृग माझे, फक्त तुझ्याचसाठी..

-विक्रम वाडकर ८-जून-२०१४

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १