मन माझे...बावरे...

गुंतणे...वेडावणे..तुझेच सारे भास हे...
भावनांचा खेळ हा..अन्...
मन माझे...बावरे... 

स्पर्श मखमली ...रेशमी.. 
जाणले जे.. आज मी..
भाव धुंदीत पाकळ्यांचे..
पाहीले ते.. साज मी..
तुझ्या माझ्या कटाक्षांचे...नाते उन-सावलीचे..
भावनांचा खेळ हा..अन्...
मन माझे...बावरे... 

ना तु काही बोलती... 
ना मी काही ऐकतो...
मुक्यानेही दो दिलांचा... 
मेळ जो सुरेख तो...
त्या बटांचे वाहणे अन्.. गंध हा वा-यासवे....
भावनांचा खेळ हा..अन्...
मन माझे...बावरे... 

जवळी येता थांबला..
श्वास काही क्षणभरा...
घायाळ करती जीव हा..
चेहरा तो लाजरा...
मनाच्या तालावरी... मोर काही नाचरे...
भावनांचा खेळ हा..अन्...
मन माझे...बावरे... 

विक्रम वाडकर (१३ जानेवारी २०१४ ११.५५)

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १