बैरी पिया...

कोवळ्या कळ्या,
तुजसाठीच आणल्या..
सुखाच्या पाऊलखुणा,
तुजपाशीच मांडल्या..
क्षण सोनेरी सुखाचे,
उंब-यात सांडले,
रेशीमगाठी या जगाच्या,
अंबरात बांधल्या...

बैरी पिया... मन तुने चुरा लिया...
बैरी पिया... बैरी पिया.

साथ तुझी अन् माझी,
साद अंतरीची...
तुजसवे राहूनी,
विसर या जगीची...
स्पर्श होता जो तुझा,
भावना भांबावल्या..
कोवळ्या कळ्या,
तुजसाठीच आणल्या..

तुजसवे का लाजला,
माळलेला मोगरा..
हास्य फुलता ते तुझे,
हर्ष माझा साजरा...
नक्षत्रांच्या चांदण्यांचा,
सडा आज मी मांडला...
कोवळ्या कळ्या,
तुजसाठीच आणल्या..

सुखाच्या पाऊलखुणा,
तुजपाशीच मांडल्या..
कोवळ्या कळ्या,
तुजसाठीच आणल्या..

-विक्रम वाडकर १४-७-१४

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १