ना कळले ग तुला तु छळले का मला...

(If u heard song jo bheji thi dua... This is marathi version for that..)

कुठे शोधू,
जे हरवले..
हास्य माझे, दिसती कुठे ना...

कुणा बोलू,
उरातले..
दुःख माझे, आतुर मी सांगण्या...

होती सारे तुझेच रे भास हे..
उष्ण वाहे मनातले श्वास रे...
डोह भरला या कॄष्णनयनांचा...
थेंब ओसरत्या काही क्षणांचा... झुला...

ना कळले ग तुला
तु छळले का मला...
जी होती स्वप्न सारी.. ती उडाली..
ठेवूनी पाणी जरा...

जो भेजी थी दुवा..
वो जाके आसमां..
से यु टकरा गयी.. के आ गयी..
है लौट के सदा...

साथी सुटले.. मन हे तुटले..
उरले.. आठवांचे जाळे...
दिस ना सरले.. कुणी मंतरले..
भरले... मेघ नभी काळे...

माझी रात-रात.. ही दुःखाची...
विचारही ना दुजा...
तुझी वाट-वाट.. पाहण्याची...
मिळते ही सजा...

जो भेजी थी दुवा..
वो जाके आसमां..
से यु टकरा गयी.. के आ गयी..
है लौट के सदा...

ना कळले ग तुला
तु छळले का मला...
जी होती स्वप्न सारी.. ती उडाली..
ठेवूनी पाणी जरा...

-विक्रम वाडकर (०१-एप्रिल-२०१४)

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १