साजणे.....

साजणे....साजणे....
सोवळे रुप डोळयात जे भरले..
मन तुझ्या प्रेमाने बहरले.. 
जसे अंबराशी चांदणे..
साजणे..... 

ओठांच्या हरकती..
प्रारब्ध स्तब्ध ठेवती..
मन माझे नादावले..
झंकारली जी पैंजणे..
साजणे..... 

भान हे वेडेपिसे..
शब्दांमधे मांडू कसे..
मन माझे वेडावले..
वाढली ही स्पंदने..
साजणे..... 

एक आता बंध रे..
फक्त ही श्वासांतरे..
मन माझे थांबले..
असे तुझे लाजणे..
साजणे..... 

पावलांचे वागणे अन् तुझ्या मागे धावणे..
मनाचे गंधाळणे.. जसे, अत्तराचे सांडणे..
साजणे..... 
साजणे..... 

-विक्रम वाडकर (४-१२-२०१४)

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १