पंढरिच्या राया..

पंढरिच्या राया, तुची..
पंढरिच्या राया..२
भक्ती लागे पांडूरंगा..
पडतो तुझ्या पाया..
पंढरिच्या राया, तुची..
पंढरिच्या राया..

मंद मंद विणेवरती.. वारकरी बोले...
'माऊली' च्या घोषामध्ये.. अंग-अंग डोले...
तुका झालासे कळस..नामदेवे पाया..
पंढरिच्या राया, तुची..
पंढरिच्या राया..

जिवे लागी ध्यान तुझे.. श्वास तू उराचा...
पाऊलांना ध्यास माझ्या.. पंढरपुराचा..
दर्शनाचा लाभ द्यावा.. तुझ्या लेकरा या...
पंढरिच्या राया, तुची..
पंढरिच्या राया..

-विक्रम वाडकर-

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १