ओ मितवा.. ओ मितवा..


ओ मितवा.. ओ मितवा.. 
क्षण वेडे ओघळले गालांवरी माझ्या,
मन हळवे आनंदले.. स्पर्शाने तुझ्या..
नाते नवे बहरले, तुझे नि माझे..
नाते नवे उलगडले, तुझे नि माझे..
तुझ्या श्वासांचा दे विसावा..
ओ मितवा.. ओ मितवा.. 

शहारलेल्या भावनांचे..
गीत आज जाहले..
स्वप्न साज जाहले..
तुजसवे जे पाहीले..
प्रेमरुपी जाणीवांना..
डोळीयांचा हा दुवा..
तुझ्या श्वासांचा दे विसावा..
ओ मितवा.. ओ मितवा.. 

भुलवते का मला..
केस मोकळे माळले..
चांदणे सोवळे सजले..
हास्य जे तुझे फुलले..
असह्य आता वाटतो,
तुझा-माझा दुरावा..
तुझ्या श्वासांचा दे विसावा..
ओ मितवा.. ओ मितवा.. 

-विक्रम वाडकर २५-११-२०१४

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १