"ती"



भर पावसात, छत्री घेऊन, प्रियकराची वाट पाहणारी ती...
डोळ्यात अधीरतेची कारण ठेवून..स्वतःशी बोलणारी ती...
मनामधली जिच्या बैचेनी.. चेह-यातुनच स्पष्ट व्हायची...
अशा नाजुक बाहुलीसारख्या... बोलक्या चेह-याची ती...

त्याचा मात्र निराळा अंदाज...उशीरा येण्याचा त्याचा ध्यास...
दर वेळी एकच कारण... "जास्त वेळ चालला माझा क्लास.."
क्लासच्या गप्पा सांगण्यात, त्याला खुप बरं वाटायचं...
पण स्वतःची घालमेल मनामधे दाबून ठेवणारी ती....

बोलता बोलता त्याला आठवायचं, तिला काहीतरी बोलू द्यायचं...
"तु नेहमीच गप्प का??" अस स्वतःच बोलुन दाखवायचं...
त्याच्या एवढ्या बोलण्यानेही.. तिचे डोळे पाणवायचे...
त्याच्या प्रत्येक प्रश्नावर स्वतःमधे हरवुन जाणारी ती..

तोही प्रेम करायचा.. पण विझणा-या दिव्यासारखा...
पुर्ण झोकून द्यायचा स्वतःला...कधी अचानक निघुन जायचा...
त्याच्या निरर्थक वागण्याला ती कधीच बोलायची नाही..
त्याच्या या सवयीला.. कधीच न कंटाळणारी ती.....

त्याच्यासुद्धा मनामधे खुप किलकिलाट होता
वाट पाहणा-या तिच्या कडे... पाहत राहण्याचाच क्लास होता..
नकळत बोलुन गेलेल्या प्रश्नांनी.. स्वतःवरच नाराज व्हायचा...
म्हणे "कसा पाहू तिच्याकडे? पाणावलेल्या डोळ्याची ती"...

काहीतरी विषय काढून..तोही खुप बोलत रहायचा.. 
तिच्या प्रत्येक हालचालीचा... वेळीच पाहून मागोवा घ्यायचा..
डोळ्यांमधे पाणी येता... अचानक उठून निघून जायचा...
दिव्यासारख्या विझणारा तो... ज्याची "मुकी" प्रेयसी ती...

--विक्रम वाडकर.(११-सप्टेंबर-२०१३)

Comments

Popular posts from this blog

सुविचार संग्रह ३

चारोळ्या...

सुविचार संग्रह १